Home > Politics > उध्दव ठाकरे यांचा राजीनामा, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया

उध्दव ठाकरे यांचा राजीनामा, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. पहा काय म्हणाले राज ठाकरे?

उध्दव ठाकरे यांचा राजीनामा, राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रीया
X

एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड केल्याने शिवसेनेत फुट पडली. तर सरकार अल्पमतात आले. त्यामुळे भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत बहुमत चाचणी करण्याची मागणी केली. त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी उध्दव ठाकरे यांना बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यावर अखेर राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. मात्र उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली नव्हती. मात्र आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच कर्तृत्व समजू लागतो. त्या दिवसापासून त्या माणसाचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी फेसबुक व ट्वीटरवर केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला होता. मात्र त्यामध्ये काही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले जात होते. तर शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला तर मनसे हा एक पर्याय असल्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी दिल्याचे म्हटले जात होते. मात्र उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मनसेने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांचे नुकसान करणाऱ्या, राज ठाकरे यांची माणसं फोडणाऱ्या, राज ठाकरे यांच्याबद्दल सतत द्वेषाचे राजकारण करणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्हाला तिळमात्र सहानभुती नसल्याची पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनीही उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Updated : 30 Jun 2022 8:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top