Home > Politics > ठाकरे गटाच्या महिलेला शिंदे गटाची मारहाण, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट चर्चेत

ठाकरे गटाच्या महिलेला शिंदे गटाची मारहाण, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट चर्चेत

ठाकरे गटाच्या महिलेला शिंदे गटाची मारहाण, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट चर्चेत
X

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आता हे प्रकरण आरोप प्रत्यारोपावरून मारहाणीपर्यंत पोहचलं आहे. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट विरुध्द एकनाथ शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या आरोप प्रत्यारोपांची ही लढाई आता मारहाणीपर्यंत पोहचली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यात ठाणे शहरातील ठाकरे गटाच्या नेत्या रोहिणी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. मात्र यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.

ठाणे शहरात ठाकरे गटाच्या रोहिनी शिंदे यांना शिंदे गटाच्या 20 महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत. मात्र हा वाद व्हॉट्सअप मेसेजवरून झाल्याचं म्हटलं जात आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर मला खात्री आहे. काही होणार नाही. न्यायाची अपेक्षा सोडली, हे सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्र्यांकडून शिकावे, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.


Updated : 4 April 2023 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top