Home > Politics > राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या, संपूर्ण कुटूंबाच्या मालमत्तेची एसीबी करणार चौकशी

राजन साळवी यांच्या अडचणी वाढल्या, संपूर्ण कुटूंबाच्या मालमत्तेची एसीबी करणार चौकशी

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज चौथ्यांदा चौकशी होणार आहे.

Rajan Salvi ACB interrogation
X

Uddhav Thackeray Group MLA Rajan Salvi increase problem because ACB Will inquiry of salvi Family property

Rajan Salvi ACB Enquiry : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची तीन वेळेस एसीबीने चौकशी केली आहे. त्यातच आता एसीबीने राजन साळवी यांच्या संपूर्ण कुटूंबाच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी बोलवले आहे.

राजन साळवी यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तीन वेळा चौकशी करण्यात आली आहे. मात्र आता राजन साळवी यांच्या संपूर्ण कुटूंबियांना अलिबाग येथील लाचलूचपत विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावं लागणार आहे. त्यानुसार साळवी सकाळी 11.30 वा. अलिबागच्या एसीबी कार्यालयात (ACB office Alibagh) येणार आहेत. नगरसेवक पदापासुन ते आमदार होईपर्यंतची कारकीर्द आणि संपुर्ण कुटूंबाचे उत्पन्न तसेच मालमत्तेबाबत सविस्तर माहिती या चौकशी दरम्यान घेतली जाणार आहे. यावेळी राजन साळवी यांचा भाऊ आणि त्यांची फॅमिली यांची चौकशी किती तास चालणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार राजन साळवी यांच्या मागे मागील अनेक महिन्यांपासून एसीबी कडून चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. त्यांच्या घराचे मूल्यांकन होताना त्यांचे अश्रू देखील अनावर झाले होते. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही चौकशी सुरू असून आता या चौकशीचा फास त्यांच्या कुटुंबियांच्या भोवती देखील आवळला जात आहे.

राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी व मोठा भाऊ दीपक साळवी व वहिनी यांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे.

Updated : 18 April 2023 3:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top