Home > Politics > देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटात उपमुख्यमंत्री पदाला लाथ मारावी, ठाकरे गटाच्या नेत्याचा सल्ला

देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटात उपमुख्यमंत्री पदाला लाथ मारावी, ठाकरे गटाच्या नेत्याचा सल्ला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही हिंदूत्ववादी असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा ठाकरे गटाने चांगलाच समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एका मिनिटात उपमुख्यमंत्री पदाला लाथ मारावी, ठाकरे गटाच्या नेत्याचा सल्ला
X

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदूत्व सोडल्याची टीका भाजप आणि शिंदे गटाकडून केली जाते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन करून काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) सत्ता स्थापन केली. मात्र दुसरीकडे भाजपच्याही हिंदूत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करीत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. (Sushma Andhare criticize to DCM devendra Fadnavis)

सुषमा अंधारे म्हणाले, जर उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली म्हणून हिंदूत्व (Hindutva) सोडल्याची धारणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असेल तर त्याच राष्ट्रवादी सोबत नागालँडमध्ये (Nagaland) घरोबा करणारी भाजप नकली हिंदूत्ववादी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हिंदूत्ववादाला भाजपने फाटा दिल्याने देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप (bjp) सोडली पाहिजे आणि संघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून फिरलं पाहिजे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाला एका क्षणात लाथ मारावी आणि पूर्णवेळ संघात जॉईन झालं पाहिजे, असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही हिंदूत्ववादी असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा ठाकरे गटाने चांगलाच समाचार घेतला आहे.

Updated : 15 March 2023 4:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top