Home > Politics > राज्यपाल संस्था बरखास्त करा, उद्धव ठाकरे यांची मागणी

राज्यपाल संस्था बरखास्त करा, उद्धव ठाकरे यांची मागणी

Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट राज्यपाल संस्थाच बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

राज्यपाल संस्था बरखास्त करा, उद्धव ठाकरे यांची मागणी
X

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल देतांना राज्यपालांवर कठोर ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल पदच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पत्रकारांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी राज्यपाल पदाची गरिमा घालवली आहे. राज्यपाल पद प्रतिष्ठेचे पद असते. मात्र त्या जागेवर अनेकदा राजकीय अभिनिवेश असलेल्या लोकांना बसवलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने राज्यपालांचं वागणं असेल तर राज्यपाल पदच बरखास्त करायला हवं, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

राज्यपाल निवडीसाठी समिती हवी

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यपाल हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नसावा. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींची नियुक्ती करताना न्यायवृंद असते. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीही समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. मात्र यापुढे राज्यपाल नियुक्त करतानाही अशा प्रकारची समिती स्थापन करायला हवी. नाहीतर राज्यपाल पदच बरखास्त करायला हवं, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

सुप्रीम कोर्टाचे राज्यपालांवर ताशेरे

सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्षात विश्वासमत घेण्याचे आदेश दिले. मात्र ते आदेश आयोग्य असल्याची टीका कोर्टाने केली. त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बहुमत गमावल्याचे कोणतेही पुरावे नसताना राज्यपालांनी असा निर्णय का घेतला? असा सवालही सुप्रीम कोर्टाने विचारला. याबरोबरच फक्त पक्षात फूट पडल्याने विश्वासदर्शक ठरावाचे आदेश देणे अयोग्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली.

Updated : 12 May 2023 6:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top