Home > Politics > Uddhav Thackeray Speech : एक महिन्यात निवडणूक घेऊन दाखवा, उध्दव ठाकरे यांचे अमित शहा यांना चॅलेंज

Uddhav Thackeray Speech : एक महिन्यात निवडणूक घेऊन दाखवा, उध्दव ठाकरे यांचे अमित शहा यांना चॅलेंज

मुंबई दौऱ्यात अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला जमीन दाखवण्याचे आवाहन केले होते. त्याचा उध्दव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी एक महिन्यात निवडणूक घेऊन दाखवा असे आव्हान अमित शहा यांना केले आहे.

Uddhav Thackeray Speech : एक महिन्यात निवडणूक घेऊन दाखवा, उध्दव ठाकरे यांचे अमित शहा यांना चॅलेंज
X

अमित शहा (Amit Shah ) यांनी मुंबई (Mumbai) दौऱ्यात ज्यांनी पाठीत खंजिर खुपसला त्या उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला जमीन दाखवा, असं आवाहन मुंबईकरांना केले. त्यावरून उध्दव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते गोरेगाव नेस्को पार्क येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.

यावेळी बोलताना उध्दव ठाकरे यांनी अमित शहा यांचा गिधाड असा उल्लेख करत हे मुंबईचे लचके तोडत असल्याचे म्हटले.

तसेच पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही एक महिन्यात मुंबई महापालिकेच्या (BMC ) आणि विधानसभा निवडणूक घेऊन दाखवा. कारण आमच्यासोबत महाराष्ट्रीतल जनतेसोबत गुजराती लोकही आहेत, असा दावा उध्दव ठाकरे यांनी केला.

यावेळी महाराष्ट्रावर अनेक शहा चालून आले. आताही अमित शहा महाराष्ट्रावर चालून येत आहेत, असंही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे अमित शहा यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रथमच जाहीर सभेतून उध्दव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.

Updated : 22 Sep 2022 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top