Home > Politics > RSS कार्यालयात ताबा घेण्यासाठी गेले होते का? उद्धव ठाकरे

RSS कार्यालयात ताबा घेण्यासाठी गेले होते का? उद्धव ठाकरे

RSS कार्यालयात ताबा घेण्यासाठी गेले होते का? उद्धव ठाकरे
X

महाराष्ट्रात टोळीचे राज्य आलेले आहे,आज रा.स्व संघाच्या कार्यालयात ताबा घेण्यासाठी गेले होते का? जे काही करु शकत नाही ते चोरी करतात अथवा ताबा घेतात, पक्ष चोरायचा, नेते चोरायचे. संघ कार्यालयातून आता बाहेर पडले असतील. पण कुठे लिंबू, टाचण्या पडल्यात का ते बघावे. रा.स्व संघाने पण आता काळजी घ्यावी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

नेमक्या ठोस योजना या सरकारकडून अद्याप विदर्भासाठी जाहीर झालेल्या नाहीत. दीड दिवस आहे सरकारकडून अपेक्षा. विदर्भाने स्वागत केले पण तुम्ही विदर्भवासियांची भावना लक्षात घेऊन ठोस अंमलबजावणी होईल अश्या योजना जाहीर करा. अर्थसंकल्प झाल्यावरच पुरवणी मागण्यांच्या बाबतीत स्पष्टता येईल. एनायटी घोटाळा, सत्तार, उदय सामंत सगळ्यांच्या घोटाळ्याबद्दल सरकार काय करणार हे जाहीर करावे, उत्तर द्यावे.

शेतकरी, महागाई सारखे विषय बोलत नाही, असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरएसएसच्या कार्यालयात भेट देण्यासाठी गेले होते त्यावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, आज रा.स्व संघाच्या कार्यालयात ताबा घेण्यासाठी गेले होते का? जे काही करु शकत नाही ते चोरी करतात अथवा ताबा घेतात, पक्ष चोरायचा, नेते चोरायचे. हामानसोपचारतज्ज्ञांना विचारण्याचा प्रश्न. संघ कार्यालयातून आता बाहेर पडले असतील. पण कुठे लिंबू, टाचण्या पडल्यात का ते बघावे. रा.स्व संघाने पण आता काळजी घ्यावी. महाराष्ट्रात टोळीचे राज्य आलेले आहे अशी जनभावना आहे.

पत्रकाराला प्रश्न तुमच्यावर खोटे आरोप झाले आत्महत्येचे तर तुम्ही स्पष्टीकरण देत बसणार आहात का जिथे तुमचा काहीच संबंध नाही? आम्ही प्रश्न मांडतोय पण सरकार उत्तर देत नाही. काल भाजपचे कर्नाटकचे मंत्री म्हणाले मुंबई केंद्रशासित करा, हा भाजपचा डाव काल बाहेर आला. कर्नाटक सरकार सर्व स्तरावर मराठी बांधवांवर अत्याचार करतय. माझी विनंती पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि निकाल येईस्तोवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवावी.

ठराव हा महाराष्ट्राच्या वतीने आहे. आम्हाला जे सुचवायचे ते सुचवले. महाराष्ट्रासाठी आम्ही ठरावाला पाठिंबा दिला. ही प्रकरणे बाहेर कुठून येताहेत हा त्यांनी विचार करावा. माझा त्यावेळेला पण माझा पाठिंबा नव्हता तेव्हा आरोप झाले मी त्या मंत्र्याला काढले हे तुम्हाला माहिती आहे. महापुरुषांचा अपमान करणारी व्यक्ती संवैधानिक पदावर कशी असू शकते. अमित शहांनी राज्यपालांच्या पत्राला काय उत्तर दिले ते कळले नाही, असे ठाकरे म्हणाले.

तिन्ही ठिकाणी भाजपची सरकार आहेत. जर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकणे बोलतात. हा भाजपचा डाव आहे. मुंबई ताब्यात आम्ही घेऊ देणार नाही. विदर्भाचा वेगळे होण्याचा मुद्दा हा विकासाशी संबंधित आहे. मी पत्रकार परिषद सुरु करतांनाच विदर्भाला काय देणार इथूनच सुरुवात केली. मी मुख्यमंत्री असतांना मिहानला, गोसीखुर्दला गेलो. यांच्या काळात उद्योग पळाले. मी शिवसेनाप्रमुखांचेच स्वप्न पूर्ण करत होतो, असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

Updated : 29 Dec 2022 10:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top