Home > Politics > अमित शहा यांना जमीन दाखवू, उध्दव ठाकरे यांचे आव्हान

अमित शहा यांना जमीन दाखवू, उध्दव ठाकरे यांचे आव्हान

Uddhav Thackeray Speech : महाराष्ट्र दिनाच्या निमीत्ताने मुंबई झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना थेट इशारा दिला.

X

Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वज्रमूठ सभेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी आव्हान दिले.

यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, मुंबई तोडण्याचे अनेक प्रयत्न सुरु आहेत. मुंबईचे (Mumbai) तुकडे करण्याचे काही जणांचे मनसुबे आहेत. मात्र मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

त्याबरोबरच अमित शहा यांनी मुंबईतील सिध्दीविनायकाच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर शहा (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे यांना आसमान दाखवण्याची भाषा केली होती. त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या सभेत घेतला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला आसमान दाखवण्याचा इशारा देणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत जमीन दाखवल्याशिवाय राहणार नाही.


Updated : 3 May 2023 2:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top