Home > Politics > भारत जोडो यात्रा भाजप कार्यालयासमोरून जात असताना असं काही घडलं...

भारत जोडो यात्रा भाजप कार्यालयासमोरून जात असताना असं काही घडलं...

भारत जोडो यात्रा भाजप कार्यालयासमोरून जात असताना असं काही घडलं...
X

राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. झालावाड क्रीडा संकुल येथून सकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या या यात्रेने सुमारे दहा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतली आहे. सध्या ही यात्रा झालावाड जिल्ह्यातील देवरी घाटात आहे. आजच्या यात्रेचा दुसरा टप्पा दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

दरम्यान, काँग्रेस नेता कन्हैया कुमारने भाजपवर हल्लाबोल करत गुजरात निवडणुकीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. मतदानाच्या दिवशी भाजपने पीएम मोदींच्या रोड शोमध्ये प्रचार केला असा आरोप त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
आज सकाळपासून भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी ही यात्रा जिल्हा भाजप कार्यालयासमोरून गेल्यावर राहुल गांधी यांनी कार्यालयावर उभ्या असणाऱ्या भाजप कार्यकर्त्याना हात केला. तर झालं असं राहुल गांधी यांची नजर त्याच्यावर पडताच त्याने फ्लाइंग किस देऊन लोकांना अभिवादन केले.

भारत जोडो यात्रा आज दुपारनंतर झालावाड येथून कोटा जिल्ह्यात दाखल होईल. आजच्या प्रवासात सुमारे 23 कि.मी. प्रवास ठरवला जाईल. पुढील चार दिवस ही यात्रा कोटा जिल्ह्यात राहणार आहे.

Updated : 2022-12-06T12:32:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top