Home > Politics > समीर वानखेडे यांच्यानंतर नवाब मलिक यांचा भाजपवर गंभीर आरोप

समीर वानखेडे यांच्यानंतर नवाब मलिक यांचा भाजपवर गंभीर आरोप

समीर वानखेडे यांच्यानंतर नवाब मलिक यांचा भाजपवर गंभीर आरोप
X

NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. बॉलिवुडच्या अभिनेत्यांना अडकवून बॉलीवूड उत्तरप्रदेशमध्ये स्थलांतरित करण्याचा भाजपचा डाव आहे , असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन हा गंभीर आरोप केला आहे

महाराष्ट्राला, राज्यातील जनतेला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे, यात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून अनेकांना अडकवले गेले, हा कट भाजपचा आहे, यातून राज्याला, सरकारला बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. तसेच यातून बॉलिवूड मुंबईतून उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे भाजपाचं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी नवाब मलिक यांनी केला.

आर्यन। खानवर कारवाई केल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांची कारवाई बनावट असल्याचा गंभीर आरोप करत समीर वानखेडे यांच्या विरोधात काही पुरावे देखील दिलेले आहेत. या पुराव्यांचा अनुषंगाने राज्य सरकारने आता समीर वानखेडे यांच्या विरोधात चौकशीला सुरुवात केली आहे, तर या प्रकरणातील एक पंचा किरण गोसावी यांना देखील अटक करण्यात आली आहे

Updated : 29 Oct 2021 6:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top