Home > Politics > ज्यांना पक्षात यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे - चंद्रशेखर बावनकुळे

ज्यांना पक्षात यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे - चंद्रशेखर बावनकुळे

ज्यांना पक्षात यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे - चंद्रशेखर बावनकुळे
X

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे विक्षिप्त पणाने केलेले आहे. महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत जे बोलले हे त्यांच्या मानसिक दिवाळखोरीचे लक्षण असल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे आमच्या नेतृत्त्वावर टीका टिपणी केली तर राज्यभरात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन पुकारावे लागेल असा इशारा बावनकुळे यांनी आंबेडकरांना दिला आहे. तसेच अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण होईल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या उद्रेकाला आंबेडकर जबाबदार असतील असे बावनकुळे म्हणाले.

ज्या जागांवर यापूर्वी विधानपरिषदेच्या निवडणूकीत जे निकाल लागले, त्यापेक्षा यावेळचे निकाल चांगले असतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. सहा वर्षापूर्वीच्या निकालात आणि यंदाच्या निकालात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला जास्त यश मिळालेले असेल, असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले. चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिलं होते आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिलं होते. स्थानिक पातळीवर सत्यजीत तांबे यांना भाजपने मदत केली आहे. त्यामुळे यावेळी चांगले निकाल येतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सत्यजीत तांबे पूर्ण मानसीकतेने आमच्याकडे आले तर त्यांचे आम्ही स्वागत करु आणि आमची त्यांना भाजपात घेण्याची पूर्णपणे तयारी असल्याचे सुद्धा बावनकुळे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सत्यजीत तांबे यांनी फक्त निर्णय घ्यावा ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले तसे सत्यजीत तांबे आले किंवा इतर कुणी आले तरी आम्ही त्यांचे सर्वाप्रमाणे स्वागत करु. आणि तांबे यांना पक्षात घ्यायला कोणतीही अडचण नाही. सत्यजीत तांबे यांचे भारतीय जनता पक्षात आम्ही व आमचे वरिष्ठ नेते सुद्धा खुल्या मनाने स्वागत करतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

Updated : 31 Jan 2023 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top