News Update
Home > Politics > तिसरी आघाडी भाजपला मदत करण्यासाठी, काँग्रेस नेत्याचा शरद पवार-ममता दीदींना टोला

तिसरी आघाडी भाजपला मदत करण्यासाठी, काँग्रेस नेत्याचा शरद पवार-ममता दीदींना टोला

तिसरी आघाडी भाजपला मदत करण्यासाठी, काँग्रेस नेत्याचा शरद पवार-ममता दीदींना टोला
X

भाजपला सत्तेबाहेर करण्यासाठी एका राष्ट्रीय आघाडीची गरज असून सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले, यावेळी त्यांनी UPA आता अस्तित्वातच नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी काँग्रेसला वगळून आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आता यावर काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावरदेखील अप्रत्यक्ष टीका केली. काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी टीका याच मुद्द्यावरुन शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तिसरा आघाडी ही भाजप आणि मोदींना मदत करणारी आहे, काँग्रेस जुना पक्ष असून भाजपला टक्कर देऊ शकतो असं नसीम खान यांनी म्हटले आहे.Updated : 2021-12-02T15:44:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top