Home > Politics > पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औंध येथील मंदिरातील पुतळा हटवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औंध येथील मंदिरातील पुतळा हटवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औंध येथील मंदिरातील पुतळा हटवला
X

पुणे : पुण्यातील औंध भागात मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंदिर उभारलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावरून भाजपवर जोरावर टीकेची झोड उठली होती दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडून संबंधित कार्यकर्त्याला कानपिचक्या मिळाल्यानंतर हे मंदिरातील मोदींचा पुतळा तातडीने हटविण्यात आला आहे.

या मंदिरातील पंतप्रधान मोदी यांचा पुतळा शेजारील नगरसेवकाच्या कार्यालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःच्या जागेत हे मंदिर उभारले होते. या मंदिरात बसवण्यासाठी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला होता. त्यासाठी 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला होता . 15 ऑगस्टला औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.

Updated : 19 Aug 2021 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top