Home > Politics > खेलरत्नला भविष्यात मोदींचं नाव दिलं जाईल- सिंह

खेलरत्नला भविष्यात मोदींचं नाव दिलं जाईल- सिंह

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे

खेलरत्नला भविष्यात मोदींचं नाव दिलं जाईल- सिंह
X


मुंबई : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव आता हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून असणार आहे. यावरून काँग्रेसकडून भाजपवर जोरदार टीका होतांना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते अभिजीत सपकाळ यांनी भाजपवर टीका करताना एक ट्विट केलं आहे. ज्यात सपकाळ यांनी म्हटलंय की, महागाई कमी झाली, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले, 12 कोटी युवकांना नोकऱ्या मिळाल्या, गंगा नदी पूर्णपणे साफ झाली, भारत विश्व गुरू बनला, प्रत्येक भारतीयाचं लसीकरण झालं, कोरोना संपला, आता मात्र फक्त नामकरण उरलं होतं म्हणूनच मोदीजी नामकरण करत आहेत, अशी बोचरी टीका सपकाळा यांनी केली मोदींवर केली आहे.




दरम्यान या नामकरणानंतर विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केल्याचे म्हटलं आहे. यातुनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचं काम मोदी सरकार करत आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे. तर, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील मोदींच्या या निर्णयाला विरोध करत , नामांतराबद्दल आश्चर्य वाटलं नाही. ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयमचं नाव बदलण्यात आलं तसंच या पुरस्कारालाही भविष्यात मोदींचं नाव दिलं जाईल, असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

Updated : 7 Aug 2021 5:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top