Home > Politics > 'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र आहेत..'' अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे भेटीत काय ठरलं?

'उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र आहेत..'' अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे भेटीत काय ठरलं?

उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र आहेत.. अरविंद केजरीवाल व उद्धव ठाकरे भेटीत काय ठरलं?
X

राज्याच्या राजकारणात रोज अनेक घटना घडत आहेत. आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejirval ) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. शिवसेनेतील बंडखोरीमुळे गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्हही उद्धव ठाकरेंनी गमावले आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल केली असली तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची चोरी झाली. त्यांच्या पक्षाचे चिन्ह सुद्धा चोरीला गेले. त्यांचे जे काही होतं ते सगळं चोरी करून नेलं गेलं, पण मी एकच गोष्ट सांगतो बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते व उद्धव ठाकरे वाघाचे पुत्र आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे हा मला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्यात सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना संपूर्ण न्याय मिळेल अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली..

उद्धव ठाकरे गट आणि आम आदमी पार्टी युती होणार?

काल अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरी म्हणजेच मातोश्रीवर जात त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे गट आणि आम आदमी पार्टी यांची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. या भेटीनंतर बोलताना आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सुद्धा युतीबाबत सूचक विधान केलं आहे. अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत हे सांगण्याची गरज नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी या युतीबाबत सूचक विधान केले आहे..

Updated : 25 Feb 2023 2:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top