Home > Max Political > सुशांतसिंग आणि दिशा सालियान यांची हत्याच, लवकरच चौकशी होणार- नारायण राणे

सुशांतसिंग आणि दिशा सालियान यांची हत्याच, लवकरच चौकशी होणार- नारायण राणे

सुशांतसिंग आणि दिशा सालियान यांची हत्याच, लवकरच चौकशी होणार- नारायण राणे
X

राज्याच्या राजकारणात एकीकडे किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत असा संघर्ष चिघळलेला आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा थेट ठाकरेंना आव्हान दिले आहे. नारायणे यांनी आता मातोश्रीवरील चौघांनी ईडीची नोटीस येईल असे म्हटले आहे. एवढेच नाही तर सुशांतसिंह आणि दिशा सॅलियन यांची हत्या झाली होती आणि या प्रकरणाची चौकशी लवकरच सुरू होईल, असा आरोपही केला होता. किरीट सोमय्या यांनी कोर्लई इथल्या जमिनीवर रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

तसेच संजय राऊत यांच्याविरोधात खोटे आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली होती. तसेच किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर आरोप केले होते, त्यामुळे ईडीच्या भीतीने नारायण राणे भाजपमध्ये गेले असा आरोप केला होता. त्याच्या या आरोपाला नारायण राणे यांनी आता उत्तर दिले आहे. राणे यांनी एक ट्विट केले आहे, "खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले." असा टोला लगावला आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये "विनायक राऊत हे घडल्यावर आपले "बॉस " आणि आपण कुठे धावणार ?" असा सवाल विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याने राणेंना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. तर आता नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची नोटीस मुंबई महापालिकेने बजावली आहे. यानंतर राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष आता चांगलाच चिघळला आहे.


Updated : 18 Feb 2022 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top