Home > Politics > एका वर्षात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 66% वरून 24% वर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांची लोकप्रियता वाढली: India Today Survey

एका वर्षात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 66% वरून 24% वर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांची लोकप्रियता वाढली: India Today Survey

एका वर्षात नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 66% वरून 24% वर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांची लोकप्रियता वाढली: India Today Survey
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता एका वर्षात 66 टक्क्यांवरून 24 टक्क्यांवर आली आहे. इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीच्या 'मूड ऑफ द नेशन' या पोलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

द मूड ऑफ द नेशन ऑगस्ट 2021 चे सर्वेक्षण 10 जुलै ते 20 जुलै दरम्यान कार्वी इनसाइट्सद्वारे करण्यात आले होते. हा पोल देशातील 19 राज्यांमधील 115 संसदीय मतदारसंघ आणि 230 विधानसभा मतदारसंघात घेण्यात आला आहे.

या सर्व्हेक्षणात भारतासाठी पुढील पंतप्रधान कोण असावा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात 24 टक्के लोकांनी मोदी यांना पंतप्रधान म्हणून पहिली पसंती दर्शवली होती. तर जानेवारी 2021 मध्ये मोदींना 38 टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दर्शवली होती. त्याच वेळी, ऑगस्ट 2020 मध्ये 66 टक्के जनतेने मोदींना पंतप्रधान पदासाठी त्यांची पहिली पसंती असल्याचे म्हटलं होतं.

इकडे मोदींची लोकप्रियता जरी घटली असली तरी भारतीय जनता पक्षाच्या दोन नेत्यांची लोकप्रियता वाढली आहे. सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ऑगस्ट 2021 मध्ये 11 टक्के लोकांनी पंतप्रधान पदाला पसंती दर्शवली आहे. तर जानेवारी 2021 मध्ये त्यांना 10 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. तर ऑगस्ट 2020 मध्ये केवळ तीन टक्के लोकांनी त्यांना पीएम पदाचं मटेरियल असल्याचं म्हटलं होतं.

केंद्रीय गृहमंत्री आणि मोदी यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे अमित शहा यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये सात टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी योग्य मानले आहेत. तर जानेवारी 2021 मध्ये हा आकडा आठ टक्के होता, तर ऑगस्ट 2020 मध्ये केवळ चार टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधान म्हणून पसंती केले होते.

यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांमधील, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून ऑगस्ट 2021 मध्ये 10 टक्के लोकांनी पसंती दर्शवली होती. तर जानेवारी 2021 मध्ये 7 टक्के लोकांना राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत. अशी इच्छा व्यक्त केली होती. तर ऑगस्ट 2020 मध्ये 8 टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधान पदासाठी पसंती दर्शवली होती.

दरम्यान,दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ऑगस्ट 2021 मध्ये पंतप्रधान म्हणून आठ टक्के लोकांनी पहिली पसंती दर्शवली आहे. जानेवारी 2021 मध्ये हा आकडा ४ टक्क्यांवर होता, तर ऑगस्ट 2020 मध्ये फक्त 2 टक्के लोकांना वाटत होतं की, केजरीवाल हे पंतप्रधान होण्याच्या पातळीवरील नेता आहे.

यासोबतच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रियतेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येत आहे. ऑगस्ट 2020 मध्ये, फक्त दोन टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधानपदासाठी योग्य मानले होते, परंतु जानेवारी 2021 ला हा आकडा दुप्पट होऊन 4 वर पोहोचला होता. तर आता ऑगस्ट 2021 मध्ये लक्षणीय वाढ झाली असून हा आकडा 8 टक्क्यांवर आला आहे.

मतदानानुसार, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय तर सोनिया गांधी यांच्या लोकप्रियता पूर्वीच्या तुलनेत घट झाल्याचं दिसून आलं. दरम्यान, ऑगस्ट 2020 मध्ये दोन टक्के लोकांनी प्रियंका गांधी यांना पंतप्रधान म्हणून योग्य मानले होते, तर ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा चार टक्क्यांवर आला.

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ५ टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी योग्य मानले होते. परंतु ऑगस्ट 2021 पर्यंतच्या सर्वेक्षणात केवळ चार टक्के लोकांनी त्यांना पसंती दर्शवली होती.

Updated : 17 Aug 2021 10:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top