Home > Politics > कोल्हापूरला जाण्यापासून रोखून दाखवा, महाविकास आघाडी सरकारला सोमय्यांचे आव्हान

कोल्हापूरला जाण्यापासून रोखून दाखवा, महाविकास आघाडी सरकारला सोमय्यांचे आव्हान

कोल्हापूरला जाण्यापासून रोखून दाखवा,  महाविकास आघाडी सरकारला सोमय्यांचे आव्हान
X

रायगड : भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू ठेवले आहेत. आता तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवार यांना आव्हान दिले आहे. मुंबईत महापालिकेचा भ्रष्टाचार असो की ठाकरे सरकारचा कोव्हिड काळात केलेला भ्रष्टाचार असो, बाहेर काढला जाईल, आणि त्यांच्या विरोधात कारवाई होणारच असा सोमय्या यांनी केला आहे. "कोल्हापूर येथील मुरगुड नगरपंचायतीने मला जाण्यास बंदी घातली आहे, परवा कोल्हापूरला जाणार आहे, व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कागल पोलीस स्थानकात 1) सर सेनापती साखर मिल घोटाळा, 2 ) गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना, आणि तिसऱ्या घोटाळ्या बाबत कारवाईसाठी तक्रार देणार आहे. हिम्मत असेल तर ठाकरे व पवार यांनी हिम्मत असेल तर अडवून दाखवा, मी कोल्हापूरला जाणारच" असे आव्हान सोमय्याने यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.

कोकणातील मुरुड कोर्लई येथील रवींद्र वायकर यांची मालमत्ता पाहण्यासाठी किरीट सोमय्या रविवारी तेथे गेले होते. 19 बंगल्यांची अनेक वर्षे रवींद्र वायकर यांनी घरपट्टी भरली होती. पण आज त्याठिकाणी बंगले नाहीत, ते बंगले कुठे गेले, याचे स्पष्टीकरण वायकर यांनी द्यावे अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

Updated : 2021-09-26T16:35:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top