Home > Politics > SRA Scam : किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ

SRA Scam : किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ

SRA Scam : किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

SRA Scam : किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ
X

Kishori pednekar : किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) प्रकल्पात घरं देण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. त्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांची चौकशीही केली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा मंगळवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

वरळी येथील गोमाता जनता SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. मधील सहा गाळे आणि सदनिका किशोरी पेडणेकर यांनी हस्तगत केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांना पत्र लिहून पेडणेकर यांनी त्यांच्या कुटूंबातील कदम यांनी अंधारी यांच्या नावाची खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच गेल्या सरकारच्या काळात मी सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा करत होतो. मात्र उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या दबावामुळे कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

काय आहे प्रकरण?

झोपडपट्टी प्रकल्पात स्वस्तात घरं देण्याचे आमिष दाखवून 9 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी जून महिन्यात गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यातील आरोपीने किशोरी पेडणेकर यांचे नाव घेतल्याने आरोपीच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलवले होते.

संजय अंधारी की सुनिल कदम?

किशोरी पेडणेकर यांचा भाऊ सुनिल कदम हाच संजय अंधारी असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच किशोरी पेडणेकर यांची सहा तपास यंत्रणांमार्फत वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरु असल्याचेही सोमय्या म्हणाले.

Updated : 30 Oct 2022 7:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top