Home > Politics > भारत जोडो यात्रेत आता सोनिया गांधी यांची एन्ट्री...

भारत जोडो यात्रेत आता सोनिया गांधी यांची एन्ट्री...

भारत जोडो यात्रेत आता सोनिया गांधी यांची एन्ट्री...
X

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेची (congress bharat jodo yatra ) सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. मुख्य माध्यमं भारत जोडो यात्रेला जास्त स्पेस देत नसले तरी जनसामान्यांमध्ये या यात्रेबद्दल कमालीची उत्सुकता असल्याचं कॉंग्रेस नेते सांगत आहे. आता या यात्रेत कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रा सोमवारी 6 ऑक्टोबरला कर्नाटकात पोहोचणार असून यावेळी त्या यात्रेत सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते भारत जोडो यात्रेअंतर्गत कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी पायी यात्रा करणार आहेत. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार यात्रेदरम्यान वाटेत भेटणाऱ्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

यादरम्यान राहुल गांधी (rahul gandhi ) सातत्याने विविध संघटनांच्या लोकांशी आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये भारत जोडो यात्रा काढल्यानंतर कॉंग्रेस पक्ष गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंडपर्यंत आणखी एक पद यात्रा काढण्याचा विचार करत आहे.

भारत जोडो यात्रेची वैशिष्टे...

भारत जोडो यात्रा 3 हजार 570 किलोमीटर लांब असणार आहे. आणि 5 महिन्यांपर्यंत ही यात्रा चालणार आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते कंटेनर मध्ये झोपतात. अशा 60 कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कंटेनरमध्ये बेड, टॉयलेट आणि एसी देखील आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी वेगळ्या कंटेनरमध्ये झोपतात तर काँग्रेसचे बाकी नेते इतर कंटेनरमध्ये.

यात्रेत सहभागी झालेले काँग्रेसचे नेते दररोज 6 ते 7 तास पायी चालतात आणि 22 ते 23 किलोमीटर अंतर कापतात.

काँग्रेसचे 119 नेते या यात्रेत सहभागी आहेत. 119 प्रवाशांपैकी 28 महिला आहेत.

Updated : 3 Oct 2022 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top