Home > Politics > गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक Solapur Politics BJP MLA Gopichand Padalkar's car was stoned, incident in Solapur

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक
X

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर मड्डी वस्ती, सोलापूर येथे दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. हा हल्ली कोणी केला अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. मात्र, आज पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा हल्ला कोणी केला याचे तर्क वितर्क लढवले जात आहेत.

काय म्हटलं होतं गोपिचंद पडळकर यांनी...

"शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख तीन खासदार आणि साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष असणाऱ्या पक्षाचे भावी पंतप्रधान अशी उपरोधिक टीका करत त्यांना पंतप्रधान पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तसंच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी संदर्भात राज्य सरकारला डाटा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकारने ते केले नाही.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली. काही जिल्ह्यासाठी मर्यादित असलेल्या नेत्यांना मी मोठे नेते मानत नाही. शरद पवार मोठे आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोण मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो.

अशी टीका पडळकर यांनी केली होती.

Updated : 30 Jun 2021 4:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top