Home > Politics > काहींना 'खाती' बदं होण्याचे दु:ख झाल्याचा मोदींचा विरोधकांवर आरोप...

काहींना 'खाती' बदं होण्याचे दु:ख झाल्याचा मोदींचा विरोधकांवर आरोप...

काहींना खाती बदं होण्याचे दु:ख झाल्याचा मोदींचा विरोधकांवर आरोप...
X

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले. यावेळी मोदी यांनी काहींना 'खाती' बदं होण्याचे दु:ख झाल्याचा आरोप विरोधकांवर केला. तर विरोधकांनी 'मोदी-अदानी भाय-भाय' च्या घोषणा देत सभागृहात मोदींच्या भाषणावेळी गोंधळ घातला.

गेल्या ९ वर्षात झालेल्या कामांची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडताना दिली. आणि आपल्या भाषणातून विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिले. यावेळी उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्यावरुन विरोधकांनी 'मोदी-अदानी भाय-भाय' च्या घोषणा सभागृहात दिल्या. देशात गेल्या ९ वर्षात ४८ कोटी जनधन खाती उघडली गेल्याची माहिती मोदींनी सभागृहात दिली. यावेळी गरीबांची खाती उघडली जात आहेत, तर काहींनी त्यांची खाती बंद होत असल्यानं दु:ख होत आहे. त्यांचं दु:खं मी समजू शकतो. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांना लगावला.

देशात गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष झालं, त्यांच्या हिताला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले. देशातील जनता काँग्रेसला वारंवार नाकारत आहे. लोक त्यांना पाहत आहेत आणि त्यांना शिक्षा देत आहेत. असेही मोदी यावेळी म्हणाले. तसचं आमची प्राथमिकता सामान्य जनता असल्याचे सुद्धा मोदींनी सांगितले. सामान्य जनतेसाठी देशातील २५ कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन उपलब्ध करुन देता आले. आम्ही गेल्या ९ वर्षात ४८ कोटी जनधन खाती उघडल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगितले. तर गावागावात २२ तास वीज देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेसचे लोक गरिबी हटोओ म्हणायचे, पण ४ दशकांहून अधिक काळ काहीही केले नसल्याचे मोदी यांनी सांगितले. देशातील लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Updated : 9 Feb 2023 9:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top