Home > Politics > Breaking - महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान

Breaking - महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान

Breaking - महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत संजय राऊत यांचे मोठे विधान
X

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना आवाहन करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. बंडखोर आमदारांनी २४ तासात महाराष्ट्रात येऊन महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी केली तर त्यांच्या मागणीवर विचार होऊ शकतो, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

वर्षा बंगल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी ही घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे सुरतहून पळून आले. त्यांना कशापद्धतीने जबदस्तीने नेण्यात आले होते, त्यांनी तिथून आपली सुटका कशी करुन घेतली याची माहिती या दोन्ही आमदारांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.

पण पत्रकार परिषदेच्या शेवटच्या टप्प्यात संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. "जे आमदार महाराष्ट्र बाहेर आहेत त्यांनी महाराष्ट्रात यावं, सोशल मीडिच्या माध्यमातून भूमिका न मांडता प्रत्यक्ष मुंबईत यावे उद्धव ठाकरेंना भेटा, .तुमची भूमिका मांडा तुमच्या भूमिकेचा विचार केला जाईल. महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या मागणीचा विचार होईल पण त्यासाठी या आमदारांनी मुंबईत यावे" असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारचे काय होणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 23 Jun 2022 9:33 AM GMT
Next Story
Share it
Top