Home > Politics > महाप्रबोधन यात्रेवरून घमासान, गुलाबराव पाटील - सुषमा अंधारे भिडले

महाप्रबोधन यात्रेवरून घमासान, गुलाबराव पाटील - सुषमा अंधारे भिडले

महाप्रबोधन यात्रेवरून घमासान, गुलाबराव पाटील - सुषमा अंधारे भिडले
X

Gulabrao patil Vs Sushama Andhare : सुषमा अंधारे यांच्या मुक्ताईनगर येथील सभेला परवानगी नाकारल्याने गुलाबराव पाटील विरुध्द सुषमा अंधारे यांच्यात चांगलेच घमासान पहायला मिळाले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला तर सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेला (mahaprabodhan yatra) सुरुवात केली आहे. या महाप्रबोधन यात्रेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) येथे सुषमा अंधारे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्याला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेवरून गुलाबराव पाटील यांनी टीका करताना म्हटले की, ही महाप्रबोधन यात्रा नसून जातीपातीचे राजकारण करणारी यात्रा आहे. तसेच सुषमा अंधारे यांनी माझी जात काढली. माझ्या आईवडिलांविषयी वक्तव्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना येड्या डोक्याचा मराठा मुख्यमंत्री असल्याचे म्हटले. मुख्यमंत्र्यांची जात काढली. तसेच माझी जात काढली. त्यामुळे सुषमा अंधारे या जातीपातीचे राजकारण करत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली. त्याबरोबरच सुषमा अंधारे या राष्ट्रवादीचे (NCP) पार्सल आहे. ज्यापध्दतीने राष्ट्रवादीने शिवसेनेचा कार्यक्रम केला. त्यापध्दतीने उरली सुरली शिवसेना (shivsena) संपवण्यासाठी हे राष्ट्रवादीने पाठवलेले पार्सल असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळे उध्दव ठाकरे (uddhav Thackeray) यांना माझी हात जोडून विनंती आहे की, त्यांनी या पार्सलपासून सावध रहावे, असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर

मी जातीवाचक भाषा वापरली की नाही ते माननीय कोर्ट ठरवेल. कारण मी या महाप्रबोधन यात्रेतून महापुरुषांचे विचार, संतांचे विचार आणि पक्षाची भूमिका याबरोबरच सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहे. मात्र गुलाबराव पाटील घाबरलेले असल्याने ते कशाच्यातरी मागे लपत आहेत. कधी जातीच्या, कधी हिंदूत्वाच्या तर कधी आणखी कशाच्या मागे लपत आहे. पण पोलिसांच्या आडून गुलाबराव पाटील यांनी केलेले कृत्य जळगावच्या जनतेला रुचले नसल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांची जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील सभा पोलिसांनी नाकारली. त्यावरून सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सुषमा अंधारे विरुध्द गुलाबराव पाटील यांच्यात नवे घमासान पहायला मिळाले.

Updated : 5 Nov 2022 8:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top