Home > Politics > उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ?

उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ?

किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपातील मुरुड कोर्लई येथील कथित 19 बंगल्याप्रकरणी उध्दव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ?
X

गेल्या वर्षी राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावे रायगड जिल्ह्यातील मुरुड कोर्लई (Murud Korlai) येथे 19 बंगले असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी कोर्लईच्या आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व आमदार रवींद्र वायकर (Ravindra waykar) यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे मुरुड कोर्लई येथे जमीन आहे. या जमिनीवर १९ बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच प्रकरणात कागदपत्रात खाडाखोड व कागदपत्रे लपवून फसवणूक केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी सोमय्या यांनी शासनदरबारी सतत पाठपुरावा केला. यानंतर अखेर या प्रकरणात पहिली अटक झाली आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ (Prashant Misal Arrest) यांना अटक करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी रोजी या प्रकरणात रेवदंडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगीता भांगरे यांनी याबाबतची तक्रार नोंदवली होती.

अलिबागमधील मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील जमीन प्रकरणी शिवसेना (Shivsena UBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत ही पहिली अटक झाली आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणात कोर्लई ग्रामपंचायतीच्या सरपंचांना अटक झाल्याने पुढचा निशाणा उध्दव ठाकरे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी किरीट सोमय्या मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

Updated : 11 April 2023 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top