Sanjay Raut : कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही, राज ठाकरेंना टोला
टीम मॅक्स महाराष्ट्र | 3 May 2022 12:00 PM IST
X
X
कुणाच्या धमक्यांवर शांती बिघडत नाही आणि कुणी सभेतून काही बोललं म्हणजे काही होत नाही, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. "पण राज ठाकरे यांच्यामागे ज्या शक्ती आहेत त्यांचा बंदोबस्त करायला हवा, ते सत्तेत येऊ शकत नाहीयत, त्यामुळे हे सारे धंदे सुरु आहेत" य़ा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निर्णय घेतला जाईल, त्यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शरद पवार, मुख्यमंत्री सारे अनुभवी आहेत, त्यामुळे इथं कयदा सुव्यवस्थेची परिस्थिती सहज निर्माण होऊ शकत नाही, कुणाच्या अल्टिमेटमवर राज्य चालत नाही" या शब्दात संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.
Updated : 3 May 2022 12:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire