Home > Politics > मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला एकनाथ शिंदे यांचे उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला एकनाथ शिंदे यांचे उत्तर

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला एकनाथ शिंदे यांचे उत्तर
X

एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना आवाहन केले आहे. पण दुसरीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी मात्र आमदारांवर टीका सुरू ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री काय म्हटले होते?

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

एकनाथ शिंदे यांचे उत्तर

एकनाथ शिंदे यांनी ऑफर नाकारली आहे. त्यांनी ट्विट केले आहे, "एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?" एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑफर नाकारली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated : 28 Jun 2022 1:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top