Home > Politics > आयोध्या दौऱ्यावेळीच होते बंडाचे षडयंत्र, नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट

आयोध्या दौऱ्यावेळीच होते बंडाचे षडयंत्र, नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट

आयोध्या दौऱ्यावेळीच  होते बंडाचे षडयंत्र, नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट
X

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांचा धुराळा पहायला मिळाला. त्यामध्ये शिवाजी पार्कवर बोलताना नितीन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यातच शिवाजी पार्कवर बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

नितीन देशमुख म्हणाल की, मुख्यमंत्र्यांनी चूक केली. जर नगरविकास खातं स्वतःकडे ठेवलं असतं तर ही वेळ आली नसती. कारण यांनी असं केलं की, एखाद्या मुलीला सहकार्य करायचं आणि सहकार्याच्या नावावर शोषण करायचं, अशा प्रकारची निष्ठा यांची असल्याची टीकाही नितीन देशमुख यांनी केली.

तसेच अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील यांनी माध्यमांसमोर या. मग मी तुम्ही कशासाठी बाहेर पडले ते सिध्द करून दाखवतो, असं म्हणत नितीन देशमुख यांनी आव्हान दिले. पुढे बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, निष्ठेच्या गोष्टी सांगणारे म्हणाले होते की, उध्दव ठाकरे यांना सांगा की महाविकास आघाडी करा. शरद पवार यांना भेटा. एवढंच नाही तर नितीन देशमुख यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.

रामाची निशाणी धनुष्यबाण होती. ती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निशाणी म्हणून घेतली. पण ती रामाची निशाणी गोठवण्याचे काम भाजप करत आहे, अशी टीका नितीन देशमुख यांनी यावेळी केली.

Updated : 6 Oct 2022 7:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top