Home > Politics > सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटील यांचा राणेंवर निशाणा

सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटील यांचा राणेंवर निशाणा

सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, गुलाबराव पाटील यांचा राणेंवर निशाणा
X

'शिवसेनेमध्ये टोपली विणणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले. शिवसेनेमध्ये पुंगानी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले. शिवसेनेमध्ये रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले. पानटपरी चालवणारा हा गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय. हे तर सोडाच... सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले, हे रसायन शिवसेनेचं आहे', अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे एक सायकल चोर असल्याचा आरोप करत शिवसेनेमुळे ते मुख्यमंत्री

झाल्याचं म्हटलं आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांची स्तुती केली तर दुसरीकडे नारायण राणे यांचा समाचार घेतला.

तीन लोकांची गाडी सुसाट चाललीये...

'मला माहितीये की, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागते. एसटी चालवायची असेल, तर लायसन्स लागते. इतकंच नाही, तर कुठलंही काम करायचं असेल, तर तुमच्याकडे तशी पात्रता असल्याचं प्रमाणपत्र लागतं. पण, शरद पवार साहेबांनी विना लायसन्सचा ड्रायव्हर बसून दिला. उद्धव साहेब ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी! माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटलं की, हा ड्रायव्हर अपघात करेल. दोन वर्षामध्ये वळणाचे रस्ते आले, टेकडी आली, पहाड आले; पण आमची तीन लोकांची गाडी सुस्साट चालतीये'. असं म्हणत

'दोन वर्षांपासून गणतपी पाण्यात टाकून बसलेत. डोंबऱ्याचा खेळ सुरु आहे. मुलगी दोरीवर चालतेय... बाहेर एक पोट्टा (मुलगा) उभा आहे. ही मुलगी कधी खाली पडेल आणि कधी मी लग्न करणार... पण चिंता करण्याची गरज नाही. हे सरकार पाच वर्षे शंभर टक्के चालणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आम्हाला जेल काय नवीन आहे का?...

50 हजारांचा भ्रष्टाचार असला, तरी ईडी. जसे पोलीस आहेत, तशी आता ईडी आहे. गुलाबराव पाटील जास्त बोलतो, लावा ईडी. आता चौफेर ईडी चालू झाली आहे. पोलिसांचा वापर. केंद्र सरकारचा वापर. उद्या म्हणतील जास्त बोलतोय याला जेलमध्ये टाका... आम्हाला जेल काय नवीन आहे का?

भारतीय जनता पार्टीला आग होऊ लागली आहे. अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Updated : 15 Oct 2021 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top