Home > Politics > एकनाथ शिंदे यांचे शरद पवार प्रतिआव्हान

एकनाथ शिंदे यांचे शरद पवार प्रतिआव्हान

एकनाथ शिंदे यांचे शरद पवार प्रतिआव्हान
X

शिवसेनेच्या नाराज आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. आपण गटनेते असल्याने विधिमंडळात आपलाच गट अधिकृत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवारांनी सर्व बंडखोर आमदारांना विधिमंडळात येऊन आपली भूमिका मांडावी लागेल आणि तिथे बहुमत सिद्ध करावे लागेल, असे म्हटले होते. तसेच एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी यआमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याचे उल्लंघन करणारा आहे, च्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम या आमदारांना त्यांना भोगावे लागतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला. असं शरद पवार म्हणाले.पण आता शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर इशाऱ्याला शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीटवरुपन उत्तर दिले आहे. रच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया...

"कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.

कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे माघार घेण्याची मनस्थितीत नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.

Updated : 24 Jun 2022 2:39 AM GMT
Next Story
Share it
Top