Home > Politics > दिपाली सय्यद यांचा टोला, 106 काय पण १३० असू द्या पण अनाजी पंतांना...

दिपाली सय्यद यांचा टोला, 106 काय पण १३० असू द्या पण अनाजी पंतांना...

दिपाली सय्यद यांचा टोला, 106 काय पण १३० असू द्या पण अनाजी पंतांना...
X

राज्यसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा मोठा विजय असल्याचे म्हटले जाते आहे. तसेच फडणवीस यांनीही २०२४ मध्ये भाजप बहुमताचे सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्याला शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. "एका राज्यसभेने मुख्यमंत्री बनता येत नाही,एका राज्यसभेने मुबंईचे महापौर बनता येत नाही,एका राज्यसभेने कोल्हापुर पोटनिवडणुक जिंकतां येत नाही.१०६ काय १३० असुद्या पण अनाजी पंतांना महाराष्ट्र स्विकारणार नाही. काही केले तरी पुन्हा येता येणार नाही. जगातील मोठा पक्ष एका राज्यसभेवर होत नाही."

असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता राज्यात प्रगतीचे राजकारण चालणार, फडणवीस आता एकटे नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच टोमणेबाजीला थारा नाही, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. या पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद यांनी एकप्रकारे अमृता फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

Updated : 11 Jun 2022 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top