Home > Politics > आदित्य ठाकरेंचं ठरलं, या तारखेला करणार अयोद्धा दौरा

आदित्य ठाकरेंचं ठरलं, या तारखेला करणार अयोद्धा दौरा

आदित्य ठाकरेंचं ठरलं, या तारखेला करणार अयोद्धा दौरा
X

शिवसेनेचे (Shivsena)खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे.आदित्य टाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली आहे.आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी आमची तारीख १० जून ठरतेय,असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav thackrey) यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये अयोध्येचा दौरा केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. आता १० जूनला आदित्य ठाकरे पक्षाच्या खासदारासंह अयोध्येचा दौरा करणार आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरु असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी उत्तर प्रदेशात असली आणि नकली अशा प्रकारचे पोस्टर कुणी लावले याबाबत विचारण्यात आलं. यावर संजय राऊत यांनी ते बॅनर कुणी लावले हे माहिती नसल्याचं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशची जनता सुजाण आहे. कुणाचा दौरा कोणत्या कारणासाठी होतो, हे त्यांना समजतं, असं संजय राऊत म्हणाले. आमचा हा राजकीय दौरा नाही, असंही ते म्हणाले. शिवसेना खासदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली काम करत नाही, असं देखील ते म्हणाले. ठाकरे यांचाच दबाव असतो,असंही ते म्हणाले.

Updated : 8 May 2022 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top