Home > Politics > सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्या जखमेवर चोळले मीठ

सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्या जखमेवर चोळले मीठ

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री पदी डिमोशन झाल्याने सामनातून देवेंद्र फडणवीस यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

विधानपरिषद निवडणूकीनंतर शिवसेनेतील एका गटाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बंड केले होते. तर अखेर 30 जून रोजी या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने या सत्तानाट्यावर पडदा पडला. त्यानंतर सामनातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 2019 च्या विधानसभा निवडणूकीनंतरच्या प्रसंगाची शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आठवण करून दिली.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, मन आणि अपराध याची सुस्पष्ट मांडणी करणाऱ्या अटल युगाचा अस्त झाला आहे. तर त्या ठिकाणी काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे करणारे अवतरले आहेत. त्याबरोबरच मोठे मन आणि छोटे मन असं म्हणत फडणवीस यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

पुढे सामनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या नाट्याचे आणखी किती अंक बाकी आहेत हे कोणालाही सांगता येत नाही. याचा अंदाज लावण्यात सारेच अपयशी ठरले. तर या काळात पडद्यामागून सुत्र हलवणाऱ्या महाशक्तीचा पर्दाफाश झाला. मात्र या नाट्यानंतर तरी हा अंक संपेल अशी शक्यता होती. मात्र या नाट्यात रंग भरण्याचे काम सुरू आहे, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

राज्यातील नाट्याचा शेवट हा सुरत, गुवाहाटी, गोवा, राजभवनमार्गे मंत्रालयात झाला. तर या नाट्याचा क्लायमॅक्स धक्कादायक होता. त्यामध्ये जे उपमुख्यमंत्री होणार होते ते मुख्यमंत्री झाले तर जे हमखास मुख्यमंत्री होणार होते ते उपमुख्यमंत्री झाले, असा टोला सामनातून देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तर याचा बचाव करण्यासाठी पक्षादेश वैगेरे सांगितले जात असल्याचे म्हटले आहे. पक्षनिष्ठा व मोठे मन हा युक्तीवाद फडणवीस यांच्या बचावासाठी केला जात आहे. त्यावरून अटल बिहारी वाजपेयी यांची कविता लिहीत सामनातून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

छोटे मन से कोई बडा नहीं होता

टूटे मन से कोई खडा नहीं होता

मात्र या ओळीपुर्वीच अटल बिहारी वाजपेयी म्हणतात की, हिमालय की चोंटी पर पहुँच

एव्हरेस्ट विजय की पताका फहरा,

कोई विजेता यदि इर्षा से दग्ध,

अपने साथी से विश्वासघात करे,

तो उसका क्या अपराध,

इस लिए क्षम्य हो जाएगा की,

वह एव्हरेस्ट की उंचाई पर हुआ था,

नहीं, अपराध अपराध ही रहेगा,

हिमालय की सारी धवलता, उस कालिमा को नहीं ढक सकती असं म्हणत सामनातून मन आणि अपराध याची व्याख्या सांगणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण सांगितली आहे.

पुढे सामनात अटल युगाचा अस्त झाला असल्याचे म्हटले आहे. तर सध्या काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे करणाऱ्यांचे दिवस असल्याचे म्हटले आहे. तसंच भाजपने मोठे मन हे अडीच वर्षापुर्वी दाखवले असते तर फडणवीस यांच्या बचावासाठी मोठ्या मनाची ढाल करण्याची गरज पडली नसते, असं सामनातून म्हटलं आहे. तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हातून महाराष्ट्र हित घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Updated : 2 July 2022 4:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top