Home > Politics > जि.प. पोटनिवडणूक, नंदुरबारमध्ये काँग्रेस-शिवसेना आघाडीला यश

जि.प. पोटनिवडणूक, नंदुरबारमध्ये काँग्रेस-शिवसेना आघाडीला यश

जि.प. पोटनिवडणूक, नंदुरबारमध्ये काँग्रेस-शिवसेना आघाडीला यश
X

नंदुरबार : राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेस व शिवसेनेची आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. जिल्ह्यातील गटांमधील ११ जागांवर ही पोटनिवडणूक झाली. पण जिल्हा परिषदेची सत्ता राखण्यात सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस यशस्वी आहेत. काँग्रेसच्या अॅड. सिमा पद्माकर वळवी ह्या जि.प.अध्यक्षा असून उपाध्यक्ष अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांचे पद रद्द झाल्याने उपाध्यक्षपद रिक्त होते. पण अॅड. राम रघुवंशी हे आता पुन्हा निवडून आल्याने ते पुन्हा उपाध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेत भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावित यांनी विजय मिळवला आहे. पण विजय कुमार गावित यांच्या पुतण्याचा पराभव झाला आहे. तर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा मुलगा राम रघुवंशी यांचा विजय झाला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषद गट- विजयी उमेदवार

१) म्हसावद- हेमलता अरुण शितोळे - काँग्रस

२)कोळदा- डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित- भाजपा

३) लोणखेडा- जयश्री दीपक पाटील- भाजपा

४) खापर- गीता चांद्या पाडवी- काँग्रेस

५) पाडळदा- मोगनसिंग पवनसिंग शेवाळे- राष्ट्रवादी काँग्रेस

६) कोपर्ली- अॅड. राम चंद्रकांत रघुवंशी- शिवसेना

७) कहाटूळ- राऊळ ऐश्वर्या जयपालसिंग - भाजपा

८) रनाळे- शकुंतला सुरेश चित्रे - शिवसेना

९) खोंडामळी- शांताराम पाटील- भाजपा

१०) शनिमांडळ- जागृती सचिन मोरे- शिवसेना

११) अक्कलकुवा- मक्राणी सुरय्याबी अमिन -काँग्रेस

भाजपा- ४

शिवसेना- ३

काँग्रेस- ३

राष्ट्रवादी काँ. – १

Updated : 6 Oct 2021 8:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top