Home > Politics > शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिला विजय, दादरा नगर हवेलीत भाजपला दे धक्का !

शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिला विजय, दादरा नगर हवेलीत भाजपला दे धक्का !

शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिला विजय, दादरा नगर हवेलीत भाजपला दे धक्का !
X

एकीकडे नांदेडमधील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसने पराभूत केले असताना आता भाजपला लोकसभा पोटनिवडणुकीतही धक्का बसला आहे. दादरा-नगर हवेली इथल्या लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी आता विजय मिळला आहे. कलाबेन यांच्या रुपाने शिवसेनेचा हा महाराष्ट्राबाहेर लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय ठरणार आहे. कलाबेन डेलकर यांना १ लाख १६ हजार तर भाजपाच्या महेश गावित यांना ६६ हजार १५७ मते मिळाली आहेत. कलाबेन डेलकर यांनी जपाच्या गावित यांचा ५० हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. या विजयानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करुन अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने कौल दिल्याचे म्हटले आहे. " दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे." असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.


तर त्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करत महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला मोठा विजय, आता दादरा-नगर हवेली मार्गे दिल्लीचे ध्येय आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राबाहेर झालेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे मानले जाते आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती.

कलाबेन डेलकर यांचे पती मोहन डेलकर हे खासदार होते, पण त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. मोहन डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपच्या काही नेत्यांवर आरोप केले होते. त्यानंतर कलाबेन डेलकर यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, तसेच शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९च्या निवडणुकीत मोहन डेलकर यांनी भाजपच्या तत्कालीन खासदाराचा पराभव केला होता. ते अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. भाजपने या निवडणुकीत प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उतरवले होते. तर शिवसेनेत्रफे आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचार केला होता.

Updated : 2 Nov 2021 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top