Home > Politics > किरीट सोमय्या यांना सीमेवर पाठवा, संजय राऊत यांचा टोला

किरीट सोमय्या यांना सीमेवर पाठवा, संजय राऊत यांचा टोला

किरीट सोमय्या यांना सीमेवर पाठवा, संजय राऊत यांचा टोला
X

जम्मू – काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांवरुन शिवसेनेने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये तणाव आहे आणि दहशतवाद पुन्हा सुरू झाला आहे. किरीट सोमय्या यांना सीमेवर पाठवा, आमच्याकडची दहशतवादबद्दलची कागदपत्रे देतो असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. " सरसंघचालक बोलले ते योग्यच आहे की ३७० कलम हटवूनही काही फरक पडलेला नाही. रोज लोकं मारली जात आहे. गृहमंत्रालयाची जबाबदारी केवळ पाकीस्तान आहे का, चीनव पण सर्जिकल स्ट्राईक करा, चीनपण लडाख, तवांगमध्ये घुसखोरी करत आहे" असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

"रोज लोक मरतायत, केंद्र सरकारनं याबाबत ठोस भूमिका घ्यायला हवी. क्रिकेट खेळून, बंद करून काश्मीरची परिस्थिती बदलणार आहे का? पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नका. तुम्ही तिकडे जाऊन केक कापता. काश्मीरमधील परिस्थिती कधी समोर येऊच दिली नाही, तिथं अनेक निर्बंध होते. गृहमंत्र्यांनी समोर येऊन परिस्थिती स्पष्ट करायला हवी. ईडी, सीबीआय, एनसीबीला सीमेवर पाठवा, फार पावरफुल लोक आहेत. सोमय्य यांनाही पाठवा, आम्ही आतंकवाद्यांचे पेपर देतो" असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.


Updated : 2021-10-18T13:33:56+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top