Home > Politics > "कुत्र्याने भाकरी पळवली म्हणून, कुत्रा मालक होत नाही" - संजय राऊत

"कुत्र्याने भाकरी पळवली म्हणून, कुत्रा मालक होत नाही" - संजय राऊत

कुत्र्याने भाकरी पळवली म्हणून, कुत्रा मालक होत नाही - संजय राऊत
X

निवडणुक आयोगाने काल दोन पक्षाच्या चिन्हांवर आणि नावावर निकाल देताना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातच ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. हा हल्लाबोल करताना राऊत यांनी शिंदे यांनी कुत्रे म्हणून संबोधले आहे. त्यांनी एका म्हणीचा आधार घेतला आहे. त्या म्हणीनुसार “पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

निवडणुक आयोगाने आपला निर्णय दिल्यानंतर राज्यभरात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आमदारांनी आणि खासदारांनी एक जल्लोष केला. मात्र दुसरीकडे संजय राऊत यांनी याबाबतीत सडकून टिका केली. त्यावेळी राऊत यांनी रावण धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो धनुष्यबाण त्यांच्या छाताडावर पडणार असल्याचा टोला लगावला. शिवसेना ही शिवसेना आहे. कुणीही कितीही शिवसेना पुसण्याचा प्रयत्नत केला तरी तो कधीही यशस्वी होणार नाही. राजकीय पक्षाची नेमकी व्याख्या काय आहे. असा सर्व पक्षांनी एकत्र येवून निवडणुक आयोगाला प्रश्न विचारणे गरजेचे असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. ५० वर्ष एखादा पक्ष आपल्या पायावर उभा राहतो, तो राजकारणात आपले स्थान टिकवून ठेवतो. आणि त्याच पक्षातील काहीजण बाहेर पडतात व पक्ष फोडतात आणि वेगळा गट निर्माण करतात. ही लोकशाही आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. असे संजय राऊत यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.

Updated : 18 Feb 2023 10:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top