Home > Politics > '...तर आम्हीही आमची संदुक उघडू' ; खासदार संजय राऊत यांचं नारायण राणेंना खुलं आव्हान

'...तर आम्हीही आमची संदुक उघडू' ; खासदार संजय राऊत यांचं नारायण राणेंना खुलं आव्हान

तुमच्याकडे जर कुंडल्या आहेत तर आम्हीही आमची संदुक उघडू असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना खुलं आव्हान दिले आहे, ते नाशिक येथे बोलत होते.

...तर आम्हीही आमची संदुक उघडू ; खासदार संजय राऊत यांचं नारायण राणेंना खुलं आव्हान
X

नाशिक : राज्यात मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय वादंग सुरू असताना नाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर पुन्हा जोरदार निशाणा सोडला आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना खुलं आव्हान दिलं आहे, तुमच्याकडे जर कुंडल्या आहेत तर आम्हीही आमची संदुक उघडू असं राऊत यांनी म्हटले आहे. सोबतच सतत बेताल व्यक्तव्य करत असताना एकदा लगाम घालणं गरजेचं होतं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायद्याने बरोबर लगाम घातला असं राऊत म्हणाले.

दरम्यान भाजपकडून राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेऊन वार केला जात असेल तर आमच्याकडेही बरेच खांदे आहेत, तुम्हाला राजकीय खांदा देऊ असा सणसणीत टोला राऊत यांनी लगावला.

दरम्यान येऊ घातलेल्या महापालिका निडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांचा नाशिक दौरा महत्वपूर्ण मनाला जात आहे, नाशिक दौऱ्यावेळी शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. संजय राऊत यांचा दौरा आणि भाजपची जनआशीर्वाद यात्रा या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू असं देखील म्हटलं आहे. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची विचार कधीही करत नाही, असं सूचक विधान त्यांनी केलं.

Updated : 28 Aug 2021 11:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top