Home > Politics > किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगड आणि शाईफेक

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगड आणि शाईफेक

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगड आणि शाईफेक
X

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या गाडीवर वाशीममध्ये दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच त्याबाबत आपण वाशीमला जाणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सोमय्या शुक्रवारी सकाळी या कारखान्याकडे पाहणीसाठी निघाले असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

भावना गवळी यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केली आणि शाईफेक देखील केली. सोमय्या यांना यावेळी काळे झेंडेदेखील दाखवण्यात आले. यानंतर किरीट सोमय्या यांना त्या ठिकाणावरुन सुरक्षिरित्या निघता आले. पण परिस्थती नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान भावना गवळी यांनी आपल्या संतप्त कार्यकर्त्यांची स्वत: घटनास्थळी येऊन समजूत घातली.
Updated : 2021-08-20T13:46:04+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top