Home > Politics > हिंगोली - शिवसेना आमदाराने वदवून घेतल्या, शाळकरी मुलांकडूनच शिवसेनेच्या घोषणा.

हिंगोली - शिवसेना आमदाराने वदवून घेतल्या, शाळकरी मुलांकडूनच शिवसेनेच्या घोषणा.

हिंगोली - शिवसेना आमदाराने वदवून घेतल्या, शाळकरी मुलांकडूनच शिवसेनेच्या घोषणा.
X

कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी 'आवाज कुणाचा ,शिवसेनेचा ', 'जय भवानी, जय शिवाजी ' या प्रकारच्या शिवसेनेच्या घोषणा चक्क शाळकरी मुलांकडून वदवून घेतल्याची घटना ही हिंगोली जिल्ह्यात घडली आहे.

कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणांमुळे वादात सापडलेले असतात. मात्र आता त्यांनी चक्क एका शाळेला भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांकडून शिवसेनेच्या राजकीय घोषणा वदवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ज्या हिंगोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलं आहे, त्याच जिल्ह्यामधून हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

विद्यमान आमदार शिवसेना पक्षाच्या घोषणा ह्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून वदवून घेतानाचा व्हिडिओ सध्या हिंगोली जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेली दीड वर्ष विद्यार्थी शाळेपासून दूर आहे, निर्बंध हटविल्यानंतर आता कुठे विदयार्थी शाळेत येत आहेत ,त्यात शिवसेना आमदाराचा हा प्रकार म्हणजे चक्क विद्यार्थ्यांवर ज्ञानार्जनाऐवजी विशिष्ट पक्षाचा प्रभाव टाकण्याचा प्रकार असल्याची भावना विरोधकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याबाबत आता याबाबत आमदारांवर काय कार्यवाही होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Updated : 2021-08-04T13:00:20+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top