Home > Politics > 'म्हणे शिवसेनेने नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले, अरे कोण नरेंद्र मोदी?'; भास्कर जाधव यांचा घणाघात

'म्हणे शिवसेनेने नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले, अरे कोण नरेंद्र मोदी?'; भास्कर जाधव यांचा घणाघात

म्हणे शिवसेनेने नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले, अरे कोण नरेंद्र मोदी?; भास्कर जाधव यांचा घणाघात
X

मुंबई : 'म्हणे शिवसेनेने नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमदार निवडून आणले, अरे कोण नरेंद्र मोदी? आज मोदी देशाचे पंतप्रधान झालेत ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे' असा शब्दांत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

जेव्हा 1984 साली भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती केली, त्यावेळी फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होता, शिवसेनेचे बोट धरून भाजप महाराष्ट्रात उभी झाली. त्यांनी आम्हाला सांगू नये नरेंद्र मोदींमुळे शिवसेनेचे आमदार निवडून आले.

जेंव्हा गुजरातमध्ये दंगल झाली तेंव्हा देशाचे तत्कालीन पंतप्रधान परदेश दौऱ्यावर निघाले तेंव्हा त्यांनी आपल्या पक्षाला प्रश्न विचारला नरेंद्र मोदींमुळे माझ्या पक्षाचं, माझ्या देशाचं तोंड काळं झालं, मी नरेंद्र मोदींना मुख्यमंत्रीपदावर काढून टाकतो, तेंव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले असं करू नका, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्री पद वाचले, आणि आज ते पंतप्रधान झाले. त्यामुळे भाजपने आम्हाला सांगू नये नरेंद्र मोदींमुळे आमचे आमदार निवडून आले, असं भास्कर जाधव म्हणाले.

या देशात काँग्रेसने सत्तर वर्ष राज्य केलं,पण कधीही सेना भवना वर टीका केली नाही आणि हे भाजपवाले शिवसेना भवनांवर टीका करतात. माझ्या तरुण शिवसैनिकांना आवाहन आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या सर्व गोष्टींवर बोललं पाहिजे असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

Updated : 18 Oct 2021 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top