News Update
Home > Politics > नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी, विधानसभेत गदारोळ

नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी, विधानसभेत गदारोळ

नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी, विधानसभेत गदारोळ
X

विधानसभेत सोमवारी पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह कृती केल्याचा आरोप करत आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांचे कायमस्वरुपी निलंबन करण्याची मागणी केली. यानंतर जोरदार गदारोळ झाला आणि सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.

पण सभागृह सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना उत्तर देत जाधव यांनी एकदा छगन भुजबळ यांचा अपमान केला होता, अशी आठवण करुन दिली. आदित्य ठाकरे यांचा अवमान केल्याच्या प्रकरणावर सभागृहात चर्चा झाली. सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्याच्या विषयावर पुन्हा एकदा ही चर्चा झाली. याच अधिवेशनात सभागृहात ३ दिवसांपूर्वी आपण अंगविक्षेप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने आपल्याला माफी मागायला सांगितली होती, तसेच फडणवीस यांनी आपल्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर आपण माफी मागितली. पण आदित्य ठाकरे जात असताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी विचित्र आवाज काढले होते. त्यानंतर सभागृहात हा विषय उपस्थित करण्यात आला होता.

यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे चुकीचे बोलले असल्याचे मान्य करत कोणत्याही सदस्याने असू वर्तन करणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी नितेश राणे उपस्थित नसल्याने मंगळवारी बैठक घेतली जाईल असे सांगितले, पण सदस्यांनी असे वर्तन करु नये, संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पाहतो आहे, रोज गदारोळ होत असल्याने जनतेमध्ये लोकप्रतिनिधींची चुकीची प्रतिमा जात असल्याचे सुनावले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले.


Updated : 27 Dec 2021 8:33 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top