Home > Politics > मोदी सरकारच्या 'दिवाळी गिफ्ट'वरुन शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून टोला

मोदी सरकारच्या 'दिवाळी गिफ्ट'वरुन शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून टोला

मोदी सरकारच्या दिवाळी गिफ्टवरुन शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून टोला
X

मुंबई : इंधनदरवाढीमुळे त्रासलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने बुधवारी काहीसा दिलासा दिला. केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली, हे नवे दर गुरुवारपासून लागू झालेत. मात्र, पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यातच शिवसेनेने या इंधन दर कपातीवरुन सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

"केंद्र सरकारने अखेर पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे मोदी सरकारचे हे सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट' वगैरे आहे, असे ढोल आता सत्ताधारी मंडळी पिटत आहेत. तेरा राज्यांतील लोकसभा विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपचे ढोल मतदारांनी फोडले असले तरी त्यांची ढोल पिटण्याची हौस काही कमी झालेली नाही." असं सामनातून म्हटले आहे.

तर , "वस्तुस्थिती ही आहे की, या पोटनिवडणुकांतील पराभवामुळेच केंद्रातील सरकारला हे शहाणपण आले आहे. सरकारला इंधन स्वस्ताईची 'दिवाळी गिफ्ट'च द्यायची होती तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही?," असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

"पोटनिवडणुकीत पराभवाचे फटके आणि झटके बसले म्हणून सरकारला जाग आली. भयंकर इंधन दरवाढीचे जे चटके सामान्य जनता सहन करीत आहे त्याची झळ भाजपाला बसली. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घाईघाईने घेण्यात आला आणि त्यावर 'दिवाळी गिफ्ट'चा मुलामा चढविला गेला" असा टोला शिवसेनेने लगावला.

Updated : 5 Nov 2021 3:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top