Home > Politics > 'कोंबडी चोर' म्हणत सातारा शहरात शिवसैनिकांनी काढला मोर्चा

'कोंबडी चोर' म्हणत सातारा शहरात शिवसैनिकांनी काढला मोर्चा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा सातारा शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला.यावेळी हातात कोंबडी घेऊन शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

कोंबडी चोर म्हणत सातारा शहरात शिवसैनिकांनी काढला  मोर्चा
X

सातारा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा सातारा शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला. यावेळी मोती चौक येथून हातात कोंबडी घेऊन शहरातून मोर्चा काढण्यात आला.'नारायण राणे चोर है' च्या घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. सातारा शहरातून पायी चालत जात शिवसैनिकांनी निषेध नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

केंद्रीय मनातरी नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यात राणेंविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी सातारा येथे काढण्यात आलेल्या मोर्चात उपस्थित शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. नारायण राणे यांना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

Updated : 2021-08-24T19:35:24+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top