Home > Politics > कसबा कोणाचा होता लोकांनी काय निर्णय घेतला... देशात बदलाचे वारे दिसत आहेत! - शरद पवार

कसबा कोणाचा होता लोकांनी काय निर्णय घेतला... देशात बदलाचे वारे दिसत आहेत! - शरद पवार

कसबा कोणाचा होता लोकांनी काय निर्णय घेतला... देशात बदलाचे वारे दिसत आहेत! - शरद पवार
X

पुण्यात झालेल्या पोटनिवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे.

"सरकार त्यांचं, सत्तेचा वापर त्यांचा" हे पदवीधर आणि कसबा निवडणुकीत (Graduate Constituence & Kasba bypoll Election)दिसुन आले. झालेल्या निवडणुकीबाबत मी काही सांगण्याची गरज नाही, ते जगजाहीर आहे. त्यामुळे आता निष्कर्ष काढणे योग्य नाही. कसबा कोणाचा होता लोकांनी काय निर्णय घेतला...बदल होण्यास अनुकुल वातावरण निर्माण होत आहे,असे मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना पवार म्हणाले की आता निष्कर्ष काढणे योग्य नाही, एकुण निवडणुकांवरुन देशात बदलाचे वारे दिसत आहेत. निवडणुका येतील त्यावेळी लोक सर्व निवडणुकांच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरुर करतील.

कांदा प्रश्नावर काय म्हणाले शरद पवार ?

मी दोन दिवसांपूर्वी नाशिक आणि नगरच्या दौऱ्यावर होतो. काही ठिकाणी कांदा फेकुन दिल्याने अतीशय वाईट परीस्थिती निर्माण झाली आहे. या सबंधी राज्य सरकार आणि केंद्र सरकार (Central Government)निर्णय घेत नाही. आम्ही सत्तेत असतानाही कांद्याच्या बाजार भावाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी सरकारने आणि नाफेडने (National Agricultural Cooperative Marketing Federation Of India) कांदा खरेदी केला, त्याच्यातुन अधिकचा आर्थिक बोजा उचलला. शिंदे आणि पडणवीस सरकार कांदा उत्पादकांबाबत 'करतो करतो' म्हणतात प्रत्यक्ष निर्णय घेत नाही, अशी टीका पवार यांनी केली.

सर्वोच न्यायालयाने ( Supreme Court) एक महत्वाचा निर्णय घेतला.निवडणुक आयोगाच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमधे बदल केला. त्यामध्ये सहभागी करुन घेतले. हा लोकशाहीच्या दृष्टीने चांगला निर्णय आहे.

Updated : 5 March 2023 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top