Home > Politics > महाराष्ट्रातील हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया, दुकानदार आणि व्यापाऱ्यांची चूक काय?'

महाराष्ट्रातील हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया, दुकानदार आणि व्यापाऱ्यांची चूक काय?'

महाराष्ट्रातील हिंसाचारावर शरद पवारांची प्रतिक्रिया, दुकानदार आणि व्यापाऱ्यांची चूक काय?
X

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मालेगाव, अमरावती, नांदेड शहरात घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या घटनांबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्रिपुरातल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं योग्य नाही. दुकानदार आणि व्यापाऱ्यांची यामध्ये चूक काय? असा सवाल करत पवार यांनी रझा अकादमी यामागे होती असं माझ्या वाचनात आलं आहे. मात्र, फॅक्ट काय ते मला माहित नाही.

निवडणूकांमुळे हिंसाचार?

निवडणुका समोर आल्यानंतर अशा प्रकारचा हिंसाचार झाला अशी शंका लोकांना आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या विषयात खोलात जाण्याची गरज असल्याचं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कारवाई...

मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की या प्रकरणाचा तपास व्हावा. जे लोक गैरसमज आणि अफवा पसवरत आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे

Updated : 17 Nov 2021 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top