Home > Politics > शरद पवार अमित शहा यांच्या भेटीला...

शरद पवार अमित शहा यांच्या भेटीला...

शरद पवार अमित शहा यांच्या भेटीला... Sharad pawar meet to Amit Shah in Delhi today

शरद पवार अमित शहा यांच्या भेटीला...
X

एकीकडे देशात पेगाससचा मुद्दा गाजत असताना आज शरद पवार अमित शहा यांची भेट होत आहे. त्यामुळं या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

दरम्यान ही भेट सहकार खात्यासंदर्भात असल्याचं बोललं जात आहे. उभय नेत्यांमध्ये आज दुपारी 2 वाजता संसद कार्यालयात ही भेट होत आहे. अमित शहा यांनी नवीन सहकार खात्याचा कारभार हातात घेतला आहे. याच मुदद्यावर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर अमित शहा आणि शरद पवार यांची भेट होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावेळी पवार यांच्या सोबत साखर संघटनेचे नाईकनवरे, दांडेगावकरही या भेटीदरम्यान उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.

दरम्यान केंद्र सरकारने एक नवीन केंद्रीय सहकार खातं तयार केलं आहे. आणि या खात्याचे मंत्री अमित शहा आहेत. याचं सहकाराबाबत शरद पवार यांनी काही मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी दरम्यान मांडले होते. या संदर्भात शरद पवार यांनी एक विस्तृत पत्र मोदी यांना दिलं होतं. या पत्रात 97 वी घटनादुरुस्ती, राज्य सहकारी संस्था अधिनियम आणि सहकाराची तत्वे या संदर्भात नव्यानं करण्यात आलेले बदल विसंगत असल्याचं पवारांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

पवार यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

सहकारी बॅंकिंग क्षेत्र राज्याचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत पवार यांनी यामध्ये केंद्र हस्तक्षेप करु शकत नाही असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेने सहकारासंदर्भात कायदे केले आहेत. आणि राज्य केंद्राने बनवलेल्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही.

आरबीआयचा सहकार क्षेत्रात वाढता हस्तक्षेप: रिझर्व्ह बँकेच्या नव्या तरतुदींच्या काही कलमांमुळे सहकारी बँकांच्या कामात हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या तरतुदी असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहेत. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच आणल्या गेल्या आहेत.

Updated : 3 Aug 2021 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top