Home > Politics > शिंदे सरकार कधी पडणार? शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

शिंदे सरकार कधी पडणार? शरद पवार यांचे सूचक वक्तव्य

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन दिवस झाले असतानाच सरकार पडण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे सरकार कधी पडणार? शरद पवार यांचे सूचक वक्तव्य
X

शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे ठाकरे अल्पमतात आले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. मात्र हे सरकार कधी कोसळणार याबाबत शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde and Devendra fadnavis) सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीची मुंबईतील वाय बी चव्हाण (Y B chavan centre) सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार कधी कोसळणार याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. (sharad pawar said when fall dawn shinde Sarkar)

शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच दोन दिवसीय अधिवेशन घेण्यात आले आहे. या अधिवेशनात भाजपचे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीसंदर्भात (Floor Test) सूचना देण्यात आल्या. त्यानंतर बोलताना शरद पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकार सहा महिन्यात कोसळेल असं वक्तव्य केले आहे.

शरद पवार म्हणाले की, 'महाराष्ट्रात स्थापन झालेलं नवं शिंदे सरकार जास्त काळ टिकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिन्यात कोसळेल. कारण या सरकारमध्ये अनेकांना मंत्रीपदाची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे जर त्यांना मंत्रीपद मिळाले नाही तर ते पुन्हा स्वगृही परततील. या नाराजांच्या फौजेमुळे हे सरकार पाच ते सहा महिन्यात कोसळेल. त्यामुळे मध्यावधी निवडणूकीसाठी तयार रहा. एवढंच नाही तर आपण विरोधी बाकावर असलो तरी आपल्या मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या, अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिल्या.

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच सोमवारी बहुमताची चाचणी होणार आहे तर त्यानंतर 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court ) निर्णय येणार आहे. त्यामुळे या निर्णयावर बंडखोर आमदारांसह शिंदे सरकारचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूका लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे ठाकरे अल्पमतात आले होते. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. मात्र हे सरकार कधी कोसळणार याबाबत शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

Updated : 3 July 2022 5:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top