Home > Politics > मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे समर्थन केल्याचे पहायला मिळाले.

मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे समर्थन केल्याचे पहायला मिळाले.

RSS प्रमुख मोहन भागवत यांनी ब्राम्हण समाजाबाबत वक्तव्य केले होते. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली.

मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे समर्थन केल्याचे पहायला मिळाले.
X

RSS प्रमुख मोहन भागवत यांनी ब्राम्हण समाजाबाबत वक्तव्य करताना म्हटले की, ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच बांधवांना मान खाली घालावी लागेल, अशा पध्दतीने वागवले. त्यामुळे ब्राम्हण समाजाने पापक्षालन करावे, असे मत मोहन भागवत यांनी विदर्भ संशोधन मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. त्यावर शरद पवार यांनी नागपूर विमानतळ येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले की, मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य माझ्या वाचनात आले आहे. समाजातील एका मोठ्या वर्गातील अनेक पिढ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. मात्र ज्यांनी ही कृत्ये केली. त्या समाजाला दिलेल्या यातनांची जाणीव त्या समाज घटकाला होत आहे. हा सकारात्मक बदल आहे. त्यामुळे नुसती माफी मागून चालणार नाही. त्यासाठी तुम्ही या वर्गाबाबत काय भूमिका घेता? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

काय म्हणाले होते मोहन भागवत?

मोहन भागवत यांनी विदर्भ संशोधन मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, आपल्या धर्मशास्रात विषमता मुळीच मान्य नाही. आपल्या देशात जनुकीय माहितीनुसार 80 ते 90 पिढ्यांपुर्वी आंतरजातीय विवाह पध्दती होती, असा दावाही मोहन भागवत यांनी केले. त्यानंतरच्या काळात ही पध्दती मोडकळीस आली. त्यानंतर वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट होत गेली. त्याबरोबरच वर्ण व जातव्यवस्था अधिक घट्ट होत गेली. त्याबरबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता नको, असं संविधानात म्हटले आहे. आपण राज्यघटनेनुसार वाटचाल करत आहोत. त्यामुळे ते आचरणात आणणे महत्वाचे आहे. म्हणून समाजात ज्या गोष्टीमुळे विषमता निर्माण होते. त्या गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्या बांधवांना मान खाली घालावी लागेल, अशा पध्दतीने वागवले. त्यामुळेच ब्राम्हण समाजाने पापक्षालन करण्याची गरज असल्याचे मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे समर्थन केल्याचे पहायला मिळाले.

Updated : 8 Oct 2022 8:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top