Home > Politics > मला गुवाहाटीची ऑफर होती, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

मला गुवाहाटीची ऑफर होती, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

मला गुवाहाटीची ऑफर होती, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
X

दहा दिवसाच्या सत्तानाट्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. मात्र सरकार स्थापन होण्याआधी एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी मलाही गुवाहाटीची ऑफर होती, असा खळबळजन दावा केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संजय राऊत यांनी गुवाहाटीचा संदर्भ देत भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, मला गुवाहाटीची ऑफर होती. मात्र मी बाळासाहेब ठाकरे यांना मानतो. त्यामुळे मी गुवाहाटीला गेलो नाही. त्याबरोबरच मुंबईतील शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हणाले की, भाजपला फसवण्याची सवय आहे. मात्र आता शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपसारखेच वागत आहेत. याबरोबरच एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यंमत्री नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याबरोबरच आपल्याच लोकांनी फसवल्याची खदखद आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.


Updated : 2 July 2022 7:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top